ajit pawar death saam tv
मुंबई/पुणे

ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो असा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त पत्रकं वाटली जाणार आहेत.

Priya More

Summary -

  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सभा आणि रोड शो रद्द

  • उमेदवार फक्त पत्रके वाटून घरोघरी प्रचार करणार

  • निवडून आल्यानंतरही कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही

सचिन जाधव, पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी बारामतीमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांच्या निधनानंतर पुण राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाहीत. मतदारांना फक्त पत्रके वाटून प्रचार करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असं आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. निवडून आल्यांनतर देखील कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही.

बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. अजित पवार यांच्या बारामतीमध्ये ४ सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईवरून बारामतीला जात होते. त्याचवेळी बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. विमान पडल्यानंतर स्फोट झाले आणि विमानाचे तुकडे झाले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्याला मोठा धक्का बसला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवून त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT