ulhasnagar crime news  saam tv
मुंबई/पुणे

Zepto वरून ऑनलाइन ऑर्डर करताय? सावधान! धारावीच्या गोदामाचा किळसवाणा प्रकार आला समोर, एफडीएनं केली कारवाई

FDA Raid On Zepto Warehouse : झेप्टोच्या धारावी गोदामावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, बुरशीयुक्त आणि अस्वच्छ अन्न साठा उघड. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने परवाना तात्काळ निलंबित.

Sakshi Sunil Jadhav

मुंबई : सध्या लोक मोठ्या संख्येने ऑनलाइन खरेदीकडे वळले आहेत. त्यामध्ये Zepto, Zomato, Swiggy, Eatclub अशा किराणाकार्ट टेक्नोलॉजीज समावेश होतो. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळात हवे असेलेले पदार्थ तुमच्या घरी पाठवले जातात. मात्र आता ऑनलाइन किराणा डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या Zepto या कंपनीच्या धारावी येथील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)छापा टाकला. यावेळी अन्नाची नासधुस आणि अस्वच्छता त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे एफडीएने तात्काळ कारवाई केली.

अन्नसुरक्षेचे अधिकारी राम बोडके यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या टीमने धारावी या भागात असलेल्या गोदामावर छापा टाकला. तिथे तपासणी करताना काही अन्नपदार्थांवर बुरशी दिसली. तसेच तिथले खाद्यपदार्थ हे अस्वच्छ दिसले. अतकेच नाही तर तिथे घाण साचलेल्या पाण्याजवळ हे सगळे पदार्थ ठेवण्यात आले होते. काही पदार्थ फ्रीजमध्ये साठवलेले असले तरी तिथले तापमान अन्नसुरक्षा नियमांनुसार नव्हते.

धारावी मधले गोदाम हे दमट आणि ओलसर होते. वाणसामान जमिनीवर साठवलेले होते. काही Expired फूड्स सुद्धा त्यात होते. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पाहणीदरम्यान या सर्व गोष्टींची नोंद केली आहे. याबाबत अन्न विभागाच्या सहाय्यक आयुक्त ''अनुपमा पाटील'' यांनी माहिती दिली की, “कंपनीकडे अन्न परवाना असला तरी गोदामातील अन्नसामग्री अत्यंत गलिच्छ व अस्वच्छ स्थितीत ठेवण्यात आली होती. अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी नियम २०११चे गंभीर उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कंपनीचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.

झेप्टो ही कंपनी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या फूड डिलीवरी कंपनी पैकी एक आहे. मात्र घडलेल्या प्रकारामुळे आता ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार आहे. ग्राहक आता कोणतेही पदार्थ मागवताना खात्री पुर्वक आणि १०० वेळा विचार करून मागवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT