Uddhav Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Maharashtra Politics : ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. आज कल्याण, डोंबिवलीमधील शिंदे गटाचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Satish Kengar

गिरीश कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

''आज मला एक गोष्टीचं बरं वाटतं आहे. तुमच्या डोळ्यावर झापड होतं, ते आता पुसलं गेलं आहे. मी हिंदुत्वाचे विचार सोडले, शिवसेना विकली, ती दूर नेहली, असे आरोप केले गेले. अनेकजण भुलले. पण आता डोळे उघडले आहेत, सगळ्यांचे. ज्यांच ऐकून आहारी गेलेलात ते सगळे आता परत येतायत,'' असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका दिला आहे. युवासेना राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. दीपेश यांच्यासह काही माजी नगरसेवकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. याचवेळी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''महाराष्ट्र विकणे हा विचार बाळासाहेब यांचा कधीच नव्हता. आम्ही स्वाभिमानाने जगू, पण लाचारी स्वीकारणार नाही, हा विचार ठेवला आहे. अनेक शेळ्या शेपट्या हलवत आहेत, सत्तेपोटी आणि सत्तेसाठी. फक्त इतकंच बोलेन थोडं आधी निर्णय घेतला असता, आधी आले असते तर ती गुलुमशाही लोकसभेलाच गडली असती.''

ते म्हणाले, काल्यणमध्ये मला एका गोष्टीचा अभिमान आहे. तिथे गुंडशाही असून सुद्धा 4 लाख मतं एका सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मिळाली. मुख्यमंत्री यांचे पुत्र समोर होते. प्रचंड पैसे ओतले, हेराफेरी केली, सध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले. पण तरीही तिथल्या शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली.

ठाकरे पुढे म्हणाले, ''त्यांनी (एकनाथ शिंदे यांनी) सत्तेच्या लोभापायी सरकार पाडलं. पण शिवसेना संपवायला गेले, त्यांना घेणार नाही. त्यांना निवडणूकीत उभं पण राहू देणार नाही. तुमची दिशाभूल झाली म्हणून परत घेतोय, कारण तुम्ही शिवसेना आणि शिवसेनेचे भविष्य आहात. अनेक बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांना मोहमाया टाकून फसवलं गेलं. त्यांचं स्वागत मी करतो.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT