Mumbai University Student Food Poisoning Saam Tv
मुंबई/पुणे

Food Poisoning: मुंबई विद्यापीठातील ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; युवासेनेने केली चौकशीची मागणी केली

Rohini Gudaghe

सचिन गाड साम टीव्ही, मुंबई

मुंबई विद्यापीठामधील कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींच्या वसतिगृहात ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. युवासेनेने (Yuva Sena) या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली (Investigation In Food Poisoning) आहे. विषबाधा पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाली की, तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची स्वच्छता न राखल्यामुळे झाली याची चौकशी करण्यात यावी, असं निवेदन युवासेनेकडून कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना ई मेल द्वारे पाठवण्यात आलं (Mumbai University Kalina Campus) आहे.

युवासेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन आढळलेल्या त्रुटींची (Nutan Girls Hoste) माहिती दिली. त्यानुसार येथील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट सोमवारी दिला जाणार (Mumbai University) आहे. तसेच पाच पैकी फक्त तीनच कुलर वापरात आहे. उर्वरीत दोन कुलर अजुन कार्यान्वित नाही, तर ते दोनही कुलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना अभियंता विभागास देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना (Food Poisoning) तातडीने औषधोपचार मिळावा. यासाठी किमान एक डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध असावा अशी व्यवस्था करण्यात यावी अशा उपाय योजना तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युवासेना माजी सिनेट सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट (Mumbai University Student Food Poisoning) दिली. त्यांनी वॉर्डन डॉ. मधुरा कुलकर्णी तसेच अभियंता आणि बाधीत विद्यार्थिनींची भेट घेतली आहे.

मुंबई विद्यापीठामधील ४० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली होती. नेमक्या कोणत्या कारणामुळे (Student Food Poisoning) विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी युवासेनेने केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT