Youths seen drinking at the doorway of a moving Mumbai local train, raising serious safety concerns. Saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! मुंबई लोकलच्या दरवाज्यात तरुणांची मद्यपार्टी; व्हिडिओ व्हायरल

Viral Video Shows Dangerous Drinking Party At Mumbai Local Train Entrance: मुंबई लोकलमध्ये धावत्या गाडीच्या दरवाज्यात बसून तरुण मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल रेल्वेमध्ये धावत्या गाडीच्या दरवाज्याजवळ बसून काही तरुण मद्यसेवन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण धावत्या लोकलच्या दरवाज्याजवळ बसून मद्यपान करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मद्यपानासोबत खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली असून, गाडीतच जणू काही पार्टी सुरू असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. हा प्रकार रविवारी मुंबईहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये घडल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरांतील लाखो नागरिक दररोज लोकल रेल्वेने प्रवास करतात. वाढती प्रवासी संख्या आणि मर्यादित गाड्या यामुळे अनेकांना गर्दीत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत धावत्या गाडीच्या दरवाज्यात बसून मद्यपान करणे हे केवळ नियमभंग नसून स्वतःसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. या व्हिडिओमुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस अशा प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत का, असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओची सत्यता आणि तो नेमका कोणत्या लोकलमधील आहे याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, व्हायरल दृश्यांमुळे रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. संबंधित तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मुंबई लोकलमधील वाढत्या बेशिस्त प्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT