Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli News : वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन केलं, पण दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तरुणाला शोधून कोठडीत टाकलं

Crime News : डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी इरफान जमादार या तरुणाला अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News : कल्याणमध्ये काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. कल्याण पत्री पूल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तलवारीने केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी इरफान जमादार या तरुणाला अटक केली आहे.

बर्थडे सेलिब्रेशन करताना दहशत पसरण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी तलवार, मोठ्या चाकूने केक कापण्याचे फॅड तरून वर्गात वाढत आहे. कल्याण पत्री पूल परिसरात देखील तलवारीने केक कापणे एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. (Latest Marathi News)

कल्याण पत्री पूल परिसरात राहणाऱ्या इरफान जमादार याचा रविवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने रात्रीच्या सुमारास इरफानच्या मित्रांनी भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन केलं. यावेळी इरफानने तलवारीने केक कापला. (Mumbai News)

या सेलिब्रेशनचा व्हिडीओ (Viral Video) त्यांच्याच सोबतच्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत शोधाशोध सुरू केली. अखेर डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी इरफान याला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT