mayank upadhyay drowned in pawana dam saam tv
मुंबई/पुणे

Maval Pawana Dam : पवना धरणात बुडून अभियंत्याचा मृत्यू, हिंजवडीमधील मित्रांवर शाेककळा

ग्रामस्थांच्या सहकार्याने पाेलिसांनी मयांक याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. लाेणावळा ग्रामीण पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

दिलीप कांबळे

Maval News :

पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका खासगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या मयांक उपाध्याय (mayank upadhyay drowned in pawana dam) याचा रविवारी मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू झाला. मयांक हा २७ वर्षीचा हाेता अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मयांक उपाध्याय हा मित्रांसह रविवारी पवना धरणात पोहण्यासाठी आला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. इतर मित्रांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पाेलिसांना देण्यात आली. त्यानंतर लाेणावळा ग्रामीण पाेलिस घटनास्थळी पाेहचले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पाेलिसांनी मयांक उपाध्याय याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मयांक याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. लाेणावळा ग्रामीण पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT