Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात ज्या ठिकाणी दहशत, त्याच ठिकाणी धिंड, पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांना शिकवला धडा, पाहा व्हिडिओ

Pune Crime : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे गाडी घासल्याच्या वादातून हवेत गोळीबार करणाऱ्या सहा आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी २४ तासांत अटक केली. आरोपींना धिंड काढून परिसरातून फिरवण्यात आले.

Alisha Khedekar

  • सिंहगड रोडवरील कोल्हेवाडी परिसरात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार

  • आरोपींनी गोळ्या झाडून परिसरात दहशत माजवली

  • नांदेड सिटी पोलिसांची तात्काळ कारवाई; २४ तासांत आरोपी अटकेत

  • अटक केल्यानंतर आरोपींची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीला इशारा

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी परिसरात गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांनी खुलेआम हवेत गोळीबार करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली. ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

मात्र, नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि फक्त २४ तासांच्या आत सर्व सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. खडकवासला चौपाटी परिसरातून ही कारवाई करण्यात आली. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची सिंहगड रोड परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कडक संदेश दिला.

साहिल अरविंद चव्हाण (वय २४, रा. सप्तगिरी हाईट्स, खडकवासला, पुणे), अभिजीत राजू चव्हाण (वय ३१, रा. तिरुमल हाईट्स, कोल्हेवाडी, पुणे), प्रशांत यशवंत चव्हाण (वय ३४, रा. सप्तगिरी हाईट्स, लमाणवाडी, खडकवासला, पुणे), आकाश भिमा चव्हाण (वय २४, रा. तिरुमल हाईट्स, खडकवासला, पुणे), गितेश शंकर जाधव (वय २०, रा. नानाजी व्हिलाच्या मागे, खडकवासला, पुणे), मंदार यशवंत चव्हाण (वय ३९, रा. सप्तगिरी हाईट्स, लमाणवाडी, खडकवासला, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी संबंधितांवर विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी वेळेत केलेल्या या जलद कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तात्काळ कृती ही अत्यंत महत्त्वाची असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.

कोल्हेवाडी परिसरात काय घडले?

४ ऑगस्ट रोजी कोल्हेवाडी येथे गाडी घासल्याच्या कारणावरून सहा तरुणांनी हवेत गोळीबार केला आणि दहशत निर्माण केली.

आरोपींना कधी अटक करण्यात आली?

नांदेड सिटी पोलिसांनी सर्व आरोपींना २४ तासांत अटक केली.

पोलिसांनी अटक केल्यानंतर काय कारवाई केली?

आरोपींची सिंहगड रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.

आरोपी कोण आहेत?

साहिल चव्हाण, अभिजीत चव्हाण, प्रशांत चव्हाण, आकाश चव्हाण, गितेश जाधव आणि मंदार चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

Ajit Pawar: जादूची कांडी नाही माझ्याकडे – विकासकामांवरील तक्रारींवर अजित पवारांचा संताप|VIDEO

Plane Crash : भयंकर! विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं; 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT