Mumbai NEws Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : ट्रॅम्पोलिन जम्पिंगवर उडी मारताच तरुणाच्या पायचा तुकडा पडला; घटनेचा भयानक VIDEO आला समोर

leg broke while jumping on trampoline : मुंबई येथील इन्फिनिटी मॉलमध्ये गेम झोनमध्ये ही घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये जम्पिंग गेम खेळणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील एका मॉलमधील गेम झोनमध्ये बाऊन्स गेम खेळल्यामुळे एका तरुणाचा पाय मोडला. 18 जून रोजी तीर्थ कांजी बेरा नावाचा विद्यार्थी आपल्या मित्रांसह मालाड, मुंबई येथील इन्फिनिटी मॉलमध्ये गेम झोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता.

गेम झोनमध्ये जाण्यापूर्वी त्याने तिकीट काढले आणि बाउन्स गेमसाठी उडी मारली. तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटला आणि तो तरुण पडला. त्यानंतर या तरुणाच्या उजव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याला कुर्ल्यातील क्रिटीकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली असलेल्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

तीर्थ कांजी बेरा हा १९ वर्षांचा आहे आणि तो विद्यार्थी राहतो. सध्या तीर्थवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यावेळी तीर्थसोबत हा अपघात झाला, त्यावेळचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तीर्थ उडी मारतो आणि जम्पिंग गेमची स्प्रिंग तुटते.

दुसरीकडे, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी गेम झोनच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बांगूर नगर पोलिसांनी (Police) सांगितले की, याप्रकरणी भादंवि कलम ३३६, ३३८ अन्वये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

SCROLL FOR NEXT