Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: मुलीला त्रास देतो म्हणून महिलेकडून तरुणाला घरात कोंडून मारहाण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू...

Pune Crime News: प्रद्युम्न कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (१८ मार्च, शुक्रवारी) सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुण्यातील शिवणे येथे एका महिलेने आपल्या मुलीला त्रास देतो एका २२ वर्षीय तरुणाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण केली आहे. प्रद्युम्न प्रकाश कांबळे असं त्या तरुणाचं नाव असून मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा या दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. (A young man locked in a house and beaten by the woman for harassing a girl; a Young man dies during treatment ...)

हे देखील पहा -

दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट (Pune) येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमधील वंदना विजय पायगुडे  या बुधवारी दुपारी घरी आपल्या मुलीला भेटायला आल्या होत्या. प्रद्युम्नला मुलीच्या आईने घरात का आला यावरून जाब विचारला असता झालेल्या वादावादीमध्ये वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्न याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर तेथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करून दांगट पाटील नगर येथील रस्त्यावर त्याला दोन युवकांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली.

याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता युवकाला मारहाण (Beaten) करून रिक्षामधून दोन जण पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. प्रद्युम्न कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (१८ मार्च, शुक्रवारी) सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिला, तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT