Train Stunt  Saam TV
मुंबई/पुणे

Railway Stunt Video : तरुणाची सुस्साट ट्रेनमध्ये जीवघेणी स्टंटबाजी, मुंबई लोकलमधील VIDEO व्हायरल

Viral VIdeo : तरुण धावत्या ट्रेनमधून दरवाजाच्या शिडीवर उभा राहून स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Vasai Virar News :

मुंबई रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन वारंवार सूचना करत असतं. मात्र काही तरुण या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील धावत्या लोकल मधून स्टंट करणाऱ्या एक तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ काल रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनचा असल्याचं समोर आले आहे. या धावत्या ट्रेनमधून स्टंट करताना तो तरुण आपल्या जीवाशी खेळत असल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये तरुणाने चालत्या ट्रेनच्या दरवाजाच्या तळाला स्पर्श काराताना आणि पायऱ्या चढून तो स्टंट करताना दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये हा तरुण जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करत प्रवास करत आहे. (Mumbai News)

एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. मात्र हा तरुण कोण आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र रेल्वे पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नागरिकांची आहे.

स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी कारावाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. इंस्टाग्रामवर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काही तरुण स्वतःच्याच जीवाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, वाहनांचं मोठं नुकसान

Marathi Natak: प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदारची जोडी पुन्हा कल्ला करणार; शांतेचं कार्टं चालू आहे पुन्हा रंगभूमीवर अवतरणार

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

Crime News: लग्नानंतर पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेताच बसला धक्का; नवरा थेट पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये

Curd And Yogurt: दही आणि योगर्ट मधला फरक काय? उन्हाळ्यात नेमकं काय खावे?

SCROLL FOR NEXT