Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: लग्नासाठी मुंबईत बोलावलेल्या तरुणाला भावी पत्नीनेच तुडवलं अन् मग...

ही धक्कादायक घटना अंधेरी पूर्व परिसरात घडली आहे.

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai Crime News: चल लग्न करू असे म्हणत तरुणीने आपल्या प्रियकराला अहमदाबादहून मुंबईत बोलावून घेतले. मात्र त्या तरुणीने होणाऱ्या आपल्या भावी पतीवरच तिच्या दोन मित्रांच्या मदतीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंधेरी पूर्व परिसरात घडली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून तरुणीसह इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता अंधेरी (Andheri) पूर्वेकडील जुना नागरदास रोड वरील हॉटेल्स प्लाझा जवळील गल्लीत ही घटना घडली. बावीस वर्षीय तरुण आपल्या प्रेमिकेच्या आग्रहाखातर लग्न करण्यासाठी मुंबईत (Mumbai) आला होता.

मात्र प्रेमिकेने तरुणाला हॉटेल ॲटलस प्लाझाजवळील एका गल्लीत नेले, त्या ठिकाणी अगोदरपासूनच त्या गल्लीत दोन तरुण उभे होते. जयश्रीने त्यांना इशारा करताच त्या दोघांनीही तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिथून फरार झाले.

गस्तीवर असलेल्या पोलिसांना (Police) ही माहिती समजतात गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या जबाबातून हा प्रकार उघडकीस आला. जखमी तरुणाच्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT