young girl writes letter and prays sant dnyaneshwar for her wedding with her love
young girl writes letter and prays sant dnyaneshwar for her wedding with her love Saam Digital
मुंबई/पुणे

Ashadhi Wari 2024: प्रेमविवाहास कुटुंबाचा विराेध, उच्चशिक्षित युवतीचे माऊलींना साकडे; दानपेटीत सापडलेल्या चिठ्ठीत काय लिहिलेय?

रोहिदास गाडगे

विठ्ठलाच्या भेटीसाठी भाविक आतुरले असून तुकाबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत. या दाेन्ही पालखी साेहळ्यात भाविक तल्लीन हाेऊन विठूरायाचे नामस्मरण करीत आहेत. या पालख्यांमधील भाविक देवाकडे आपली गा-हाणी मांडताना दिसून येत आहे. एका युवती भाविकाने चक्क प्रेम विवाहास कुटुंबियांचा विराेध असल्याने प्रेम लग्नबंधनात यावं असं साकडं चिट्ठीतुन माऊलींकडे मांडलं आहे.

माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी लाखो भाविक आळंदी मध्ये दाखल होतात. यावेळी वारकरी भाविक माऊलींकडे जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी व्यक्त करत असतात. काही भाविक तर दानपेटी मध्ये दान करतानाच त्यांच्या समस्याही चिठ्ठीच्या स्वरूपात टाकत असतात. आज भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या चिठ्ठ्या वाचताना वैयक्तिक समस्यांबराेबरच सार्वजनिक समस्या साेडविण्यासाठी गा-हाणे मांडल्याचे चित्र हाेते.

माऊलींच्या दानपेटीत शेतकऱ्याने माऊली महाराज पाऊस पडू दे सर्वांना सुखी राहू दे असे मागणे चिठीच्या स्वरूपात केले आहे. एका भाविकाने आई वडीलांना सुखी ठेवा अशी मागणी केली आहे.

माऊलींकडे साकडं, प्रेम लग्नबंधनात यावं

दुसरीकडे एका युवतीने आपल्या प्रेमाची कबुली देत लग्न होण्याचं साकडं घातले आहे. संबंधित युवती उच्चशिक्षित असून कुटुंबाचा विरोध लक्षात घेता आपले प्रेम लग्नबंधनात यावं असं साकडं तिने चिट्ठीतुन माऊलींकडे मांडलंय. दरम्यान ज्ञानाेबा तुकाराम असा गजर करत भाविक पंढरपूरकडे कूच करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Umbrella Buying Tips : स्वस्तात मस्त आणि टिकाऊ छत्री खरेदी करताय? मग 'या' टिप्स नक्की वाचा

Parbhani Accident: साईबाबांच्या दर्शनाहून परतताना भाविकांवर काळाची झडप; दोघांचा जागीच मृत्यू तर १२ गंभीर

Rahul Gandhi May Participate Wari : राहुल गांधी वारीत सहभागी होणार, काँग्रेस आमदाराने तारीखच सांगितली

Dhananjay Munde: कृषिमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन शेतकरी आक्रमक; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी!

Maharashtra Live News Updates : ४० अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा बैठक

SCROLL FOR NEXT