Aditi Tatkare, Shrikant Shinde
Aditi Tatkare, Shrikant Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

आमचा फक्त 'तटकरे पॅटर्न'; राज्यमंत्री आदिती तटकरेंच्या उत्तरानं सगळेच झाले अवाक्

साम टिव्ही ब्युरो

पुणे : 'खूप कमी वयात आपण निवडून आलात, राज्यात मंत्रीही झालात, आता पुढे आपल्याला लोकसभेवर जायला आवडेल की, राज्यातच मंत्रिपद भूषवायचं आहे'? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shivsena MP Shrikant Shinde) यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे (NCP Aditi Tatkare) यांना विचारला. त्यांच्या या प्रश्नावर 'जसा तुमचा राज्यातून केंद्रात जाणारा शिंदे पॅटर्न, तसाच आमचा तटकरे पॅटर्न' असं हटके उत्तर आदिती तटकरेंनी दिलं. पुण्यात सरकारनामा 'ओपन माईक चॅलेंज' (Sarkarnama Open Mic Challenge) हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात राज्यातील तरूण नेत्यांनी पत्रकारांच्या भूमिकेतून एकमेकांना तिखट प्रश्न विचारले. अर्थात त्याला मिळालेली उत्तरेही तितकीच हजरजबाबी होती.

राजकारणापलीकडे रंगलेल्या या राजकीय सामन्यांत सर्वपक्षीय युवा नेत्यांनी धमाल उडवून दिली. या रंगतदार कार्यक्रमात राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), MIM खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) आणि भाजपचे आमदार परिणय फुके (parinya phuke) यांची उपस्थित होती.

राज्यातील तरूण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र कसा आहे, या पत्रकारांच्या भूमिकेतून राज्यातील युवा नेत्यांनीच एकमेकांना तिखट प्रश्व विचारले. त्याला मिळालेली उत्तरे सुद्धा तिखटच होती. सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमात युवा नेत्यांमध्ये रंगलेला हा राजकीय सामना चांगलाच रंगतदार झाला. 'सरकारनामा हिट वेव्ह,' 'सरकारनामा फेस ऑफ', अशा रंगतदार कार्यक्रमात राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आपल्या सहकारी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना जबरदस्त उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला MIM चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी तटकरेंना "आपल्या घरातील किती लोकांनी राजकारणात मोठ्या जागा अडवून ठेवल्या आहेत, आपले वडील खासदार, तुम्ही राज्यमंत्री, तुमचा भाऊ आमदार आहे, तर बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का " असा उपरोधिक प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, "आम्ही तीनही जण हे लोकांमधून निवडून आलो आहोत. जनतेला मंजूर असेल म्हणून त्यांनी आम्हाला निवडून दिले असेल," खरं तर जलील यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देणं आदिती यांच्यासाठी कठीण होतं. मात्र त्यांनी अतिशय सावधपणे उत्तर देत जलील यांना निरुत्तर केलं.

त्यानंतर कॉंग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी आदिती यांना "अजितदादा की सुप्रियाताई" असा कोंडित टाकणारा प्रश्न विचारला. पण आदिती यांनी तेवढ्याच हजरजबाबीपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या,"राज्यात अजितदादा, अन् केंद्रात सुप्रियाताई." पुढे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदिती यांना त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारला. "कमी वयात आपण मंत्रिपदी आहात. तुम्हाला लोकसभेत जायला आवडेल की राज्यातच मंत्रिपद भूषवायचं आहे ," खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, "माझे वडील पंचवीस वर्षे आमदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. तसाच राजकीय प्रवास मी करणार आहे, जसा तुमचा राज्यातून केंद्रात जाणारा शिंदे पॅटर्न, तसाच आमचा तटकरे पॅटर्न."

दरम्यान, आमदार परिणय फुके यांनी देखील आदिती तटकरे यांना एक प्रश्न विचारला. "सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील दोन मंत्रीपदे खाली आहेत, तुमचं दोन अडीच वर्षांचं काम पाहून तुमच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं की तुम्हाला कॅबिनेट मंत्री करावं, तर तु्म्हाला गृहमंत्रिपद सांभाळायला की अल्पसंख्याक मंत्री व्हायला आवडेल," आमदार परिणय फुके यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, "मी सध्या तर राज्यमंत्री म्हणून खूश आहे. पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्रिपद मिळणं ही देखील मोठी गोष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत पंचवीस वर्षे महाविकास आघाडीचं सरकार टिकेल. त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये कॅबिनेट मंत्री व्हायला आवडेल.

युवा नेत्यांमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पा मारल्या. तसेच या अराजकीय प्रश्नांना सडेतोड उत्तरेही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ मिरचीचे स्टार RJ राहुल यांनी केले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT