धनंजय मुंडेंना धमकावणाऱ्या रेणू शर्माला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूली करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे.
Dhananjay Mundhe
Dhananjay MundheSaam Tv
Published On: 

मुंबई: मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना बदणामीची धमकी देण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या रेणू शर्मा (Renu Sharma) हिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूली करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप शर्मावर आहे. त्या २० एप्रिलपासून अटकेत आहेत.

अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोप अत्यंत गंभीर असून तपास सुरू आहे. त्यामुळे या टप्प्यावर जामीन मंजूर केल्यास तपासावर निश्चितपणे परिणाम होईल, असे कारण देत न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळला अर्ज आहे.

Dhananjay Mundhe
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंमुळे वाचले तरुणाचे प्राण, ताफा थांबवून रुग्णवाहिका मागवली | SAAM TV

मागिल काही दिवसापूर्वी रेणू शर्मा(Renu Sharma) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्मा यांच्यावर आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. रेणू शर्मा हिने एप्रिल ते मार्च महिन्या दरम्यान आंतरराष्ट्रीयनंबरवरुन कॉल करुन पैशांची मागणी केली होती, हे न दिल्यास बदणामी करणार असल्याची धमकी दिली होती, असा आरोप रेणू शर्मावर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com