Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : खोटे शिक्के घेतले, कागदपत्रे तयार केली; पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला बेड्या

Pune News : पुणे महापालिका आणि युनियन बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बनावट एफडीआर, खोटे शिक्के वापरून मोठा आर्थिक घोटाळा. ठेकेदार फरार असून तपास सुरू.

Alisha Khedekar

  • PMCमध्ये बनावट एफडीआर सादर करून २० लाखांची फसवणूक

  • आरोपी ठेकेदारावर गुन्हा दाखल

  • अतिरिक्त आयुक्तांनी काळ्या यादीत टाकत कामाची रक्कम जप्त करण्याचा आदेश

  • पोलीस तपासातून आणखी आरोपी उघड होण्याची शक्यता

सागर आव्हाड, पुणे

पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर अखेर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदारास ताब्यात घेतल्यानंतर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कागदपत्रे कोठून तयार केली, यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याची महत्वाची माहिती तपासात पुढे येणार आहे. सलीम गाजीबक्ष बांगी (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, सध्या रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या तयार करणे आणि पालिका, बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

कनिष्ठ अभियंता माधुरी ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये निविदा मिळविण्यासाठी आरोपी बांगी याने युनियन बँकेच्या वीस लाख रुपयांच्या बनावट मुदत ठेव पावत्या पालिकेला सादर केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शाखा प्रमुख शशी साटोटे यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. लोहगाव टाईम्स सह अनेक माध्यमांनीही हे प्रकरण लावून धरले होते.

संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर चौकशी झाल्यावर ठेकेदाराने बनावट मुदत ठेव पावत्या देऊन पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दोषी ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून पाच कामांची बयाणा रक्कम जप्त करणे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावे, असे आदेश दिले होते.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. अखेर आठ दिवसांनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या ठेकेदारावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या आरोपीवर कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ठेकेदार अटक झाल्यावर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कुठे तयार केली, यामध्ये कोणाचा हात आहे, तसेच आणखी किती लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : हिंगोली- स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही गावात सुविधा मिळत नसल्याने गावकरी 15 ऑगस्ट रोजी करणार बिऱ्हाड आंदोलन

"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

बाजारातील महागड्या क्रिम्सची गरज नाही! रोज सकाळी आवळ्याचा रस प्या, केस मुळापासून होतील दाट

Loksabha: मोदी- शाह अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत आले, पण लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

SCROLL FOR NEXT