Virar : विरार इमारत दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, पालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला अटक; १७ जणांचा झाला होता मृत्यू

Virar Ramabai Apartment Collapsed : विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी धोकादायक इमारतीवर वेळेवर कारवाई न केल्याबद्दल सहाय्यक आयुक्त गिल्सन गोंसालविस यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे.
Virar : विरार इमारत दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, पालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला अटक; १७ जणांचा झाला होता मृत्यू
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • १७ जणांचा बळी गेलेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई

  • निष्काळजीपणामुळे सहाय्यक आयुक्त गोंसालविस अटकेत

  • रहिवाशांना इमारत धोकादायक असल्याची माहिती न दिल्याचा आरोप

  • गणेशोत्सव काळातील दुर्घटनेने शहरात खळबळ उडाली

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. २६ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या इमारतीच्या दुर्घटनेत १७ रहिवाशांचा नाहक बळी गेला. ही इमारत अनधिकृत आणि असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून दुर्घटनेच्या ३ महिन्यांनंतर धोकादायक इमारतीविरुद्ध वेळेवर कारवाई न केल्याबद्दल सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटना प्रकरणी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘C’ चे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोंसालविस यांना गुरुवारी मध्यरात्री गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी गोंसालविस यांना न्यायालयात चौकशीसाठी हजर करण्यात आले आहे.

Virar : विरार इमारत दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, पालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला अटक; १७ जणांचा झाला होता मृत्यू
Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

सुमारे एक महिन्यापूर्वी विरार पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र चौकशीदरम्यान त्यांनी दिलेली उत्तरे असमाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना अखेर अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,या घटनेनंतर पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी हा तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडे सोपवला होता. ज्यांनी या घटनेची चौकशी सुरू ठेवली. चौकशीदरम्यान असे दिसून आले की इमारत धोकादायक घोषित करूनही, गोन्साल्विस यांनी रहिवाशांना त्याची माहिती दिली नाही. तसेच विकासकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली नाही.

Virar : विरार इमारत दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, पालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला अटक; १७ जणांचा झाला होता मृत्यू
Pune : पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत, रस्ता अडवून एसटी चालकाला मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

२६ ऑगस्टच्या रात्री काय घडलं?

विरार येथे मध्यरात्री रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा चौथ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. या दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला. ही दुर्घटना गणेशोत्सव काळात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. ऐन गणेशोत्सवात नागरिकांना आपलं राहतं घर सोडावं लागलं. याप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com