Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Daund: बंदुकीचा धाक दाखवत चोरी करणारे सहा अटकेत; यवत पोलिसांची कारवाई

पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

मंगेश कचरे

यवत : बंदुकीचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या टोळीचा यवत (yavat) पोलिसांनी (police) मुसक्या आवळल्यात. दौंड (daund) तालुक्यातील सहजपुरमध्ये (sahajpur) सुरक्षा राक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याच्या घटनेत सहा जणांना अटक (arrest) करण्यात आली आहे. (yavat latest marathi news)

सहजपुरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम साहित्य मोकळ्या जागेत पडून होते. ते साहित्य आम्हांला दे अशी मागणी संशयित आरोपीने ठेकेदारास काही दिवसांपूर्वी केली परंतु साहित्य देण्यास ठेकेदाराने नकार दिला. रविवारी संशियत आरोपी संजय ठाकूर याने त्याच्या साथीदारांना आणून सुरक्षा रक्षकास बंदुकीचा धाक दाखवून सहा लाखांचे साहित्य चोरी करून नेले.

या प्रकरणी ठेकेदार उन्नीकृष्णन यांनी संजय ठाकूर याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानूसार यवत पोलिसांनी संजय ठाकूर, अशोक जाधवर, साजिद शेख, अबरार महंमद, मकरंद पाटील, सुरेंद्र सिंग यांच्यासह अन्य पाच ते सहा लाेकांवर यवत पोलीस ठाण्यात (yavat police station) गुन्हा नोंद करून ६ जणांना अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT