Chaundi, Dhangar Aarakshan Andolan saam tv
मुंबई/पुणे

Dhangar Aarakshan Andolan : धनगर आरक्षणासाठीच्या उपाेषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

या आंदाेलनामुळे राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढणार अशी चर्चा नगर जिल्ह्यात सुरु आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Chaundi News : धनगर आरक्षणासाठी लढा देत असलेल्या चौंडीतील आंदाेलकांची प्रकृती ढासळू लागली आहे. दरम्यान मरण आले तरी पत्करु मात्र आरक्षण मिळाल्या शिवाय बेदमुत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. (Maharashtra News)

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) जालना (jalna) जिल्ह्यात आंदोलन आक्रमक बनले असताना आता धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटला आहे. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून चौंडीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांनी घेतला आहे.

त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात जशा राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या, तशाच चौंडीत धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणीही नेते भेटीगाठी देत आहेत.

दरम्यान आज धनगर आरक्षणासाठी लढा उभारलेल्या चौंडीतील आंदाेलकांची प्रकृती ढासळली आहे. आता आर या पार अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे. केंद्र सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनात हा प्रश्न मिटवून टाका अन्यथा धनगर समाज संपूर्णपणे उध्वस्त होऊन जाईल अशी भावना यावेळी यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT