उरणच्या यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेखला चार दिवसांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून दाऊला जेरबंद केलं. एवढंच नव्हे तर दाऊदनं यशश्रीची हत्या केल्याची कबुलीही दिली. यशश्री शिंदेची 25 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती.
26 जुलै रोजी यशश्रीचा मृतदेह उरणमध्ये पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस आढळून आला होता. अतिशय छिन्न-विछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात काय घडलं? ते पाहूया
यशश्री आणि दाऊद शेखमध्ये 3-4 वर्षांपासून मैत्रीचे संबंध
25 जुलैला दोघांमध्ये काही कारणांवरून वाद
रागाच्या भरात दाऊदकडून यशश्रीची हत्या
26 जुलैला उरणमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
आरोपी दाऊद शेख कर्नाटकमध्ये फरार
कर्नाटकच्या गुलबर्गामधील डोंगर रांगेतून अटक
यशश्रीच्या हत्येनंतर नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात नागरिकांनी मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली होती. आमदार नितेश राणेंनी या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला होता. त्यामुऴे हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. बेलापूरमधील अक्षता म्हात्रे आणि उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येनंतर नवी मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. असे प्रकार घडू नयेत म्हणून मुलांमध्ये आणि पालकांमध्येही जनजागृती करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.