प्रसिद्ध रहस्यकथाकार गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध रहस्यकथाकार गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड Saam TV
मुंबई/पुणे

प्रसिद्ध रहस्यकथाकार गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड

वृत्तसंस्था

पणजी : तब्बल बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे, रहस्यकथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले गोव्याचे लेखक गुरुनाथ नाईक (Gurunath Naik) (८४) यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच गुरुनाथ नाईक यांनी रहस्य कादंबर्‍यांव्दारे एका मोठा चाहता वर्ग आपलासा केला होता. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्ताने वास्तव्य केलेले नाईक मूळचे गोव्यातील साखळीचे रहिवासी.

रहस्यकथाकार होण्यापुर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईकांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण देखील केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या होत्या. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते महिन्याकाठी ते ७-८ कादंबर्‍या ते सहज लिहित होते. प्रत्येक कादंबरीच्या त्यांच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत. इतक्या प्रतिभावान लेखकाबद्दल अनेकांना माहित देखील नाही. नाईकांनी बरेच वर्ष दैनीक एकमतचे संपादक म्हणून काम केले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT