Breaking: परमबीर सिंग प्रकटले; चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर

अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चांदिवला आयोग चौकशी करत आहे.
परमबीर सिंग प्रकटले; चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर
परमबीर सिंग प्रकटले; चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादरSaam TV

मुंबई: अनिल देशमुखांविरोधात (Anil Deshmukh) आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नसल्याचे परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी सांगितले आहे. परमबीर सिंह यांनी चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अनिल देशमुखां विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चांदिवला आयोग चौकशी करत आहे. वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह आयोगापुढे चौकशासाठी गैरहजर राहत होते. दोन दिवसांपुर्वी एवढे दिवस गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर आज परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र लिहीले आहे.

परमबीर सिंग प्रकटले; चांदिवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर
''प्रतीक काळेच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करा''

दरम्यान सचिन वाझेने २५ जून २०२१ व १५ जुलै २०२१ यादिवशी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. तसेच ११ जून २०२१ रोजी संजय पाटील यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. या दोन्ही प्रतिज्ञापत्राबाबत मला अधिक काहीही बोलायचं नाही असे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी चांदिवाल आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. तसेच या दोघांच्या प्रतिज्ञापत्रातील खुलाशाबाबत मला वैयक्तित काही बोलायचचं नाही असेही त्यावेळी परमबीर सिंग म्हणाले होते. तसेच मला चांदिवाल आयोगासमोर कुठल्याही पक्षाची उलट तपासणी व पुरावे सादर करायचे नाही असेही परमबीर सिंग म्हणाले होते. तसेच माझा प्रत्यक्ष उपस्थितीबाबत सूट मिळावी. असे परमबीर सिंह यांनी त्यांच्या वकिलाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर असा प्रश्न उपस्थीत झाला होता की परमबीर सिंग चांदिवाल आयोगाच्या चौकशीवरुन पळ काढत आहेत.

काल अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात ते म्हणाले होते माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत. सरकारमधील अनेक नेते भाजप सरकारवर टीका करत होते की परमबीर सिंग यांना परदेशात पळवले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com