''प्रतीक काळेच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करा''

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री . उपाध्ये बोलत होते.
''प्रतीक काळेच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करा''
''प्रतीक काळेच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करा''Saam TV

मुंबई: राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankar Rao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या प्रतीक काळे (Pratik Kale Suicide Case) नावाच्या युवकाने गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून आत्महत्या केली होती. त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा टीकेला जोर आला आहे. ठाकरे सरकारच्या सत्तेच्या मस्तीचा आणखी एक नमुना समोर आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याकरिता गडाख यांना मंत्रीपदावरून दूर करावे अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Spokeperson) यांनी आज केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री . उपाध्ये बोलत होते.

''प्रतीक काळेच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करा''
#SpiritofCricket: पाकिस्तानी खेळाडू नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये; पाहा Video

गेल्या आठवड्यात प्रतीक काळेच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आल्यापासून नगर जिल्हा हादरला आहे. केवळ २७ वर्षांच्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेऊन प्रतीक काळे याने गळफास लावून घेतला होता. हा व्हिडिओ त्याची मृत्यूपूर्व जबानी असल्याने त्या दिशेने तपास होणे गरजेचे असून शंकरराव गडाख हे सत्तेवर असल्याने तपासावर दबाव येऊ शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पदावरून दूर करावे, असे उपाध्ये म्हणाले. याआधीही ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना पुजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. अनेक अत्याचारांचे आरोप असताना देखील मंत्री उजळ माथ्याने फिरत असल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com