मुंबई/पुणे

Worli Politics : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी एकनाथ शिंदे टाकणार डाव; वरळीत उतरवणार तगडा उमेदवार

Worli political News : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी एकनाथ शिंदे डाव टाकण्याच्या तयारीत आहे. वरळीत शिंदे आदित्य ठाकरेंच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करणार आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर अतीतटीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वरळीत ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर शिंदे गटाने वरळी विधानसभा मतदारसंघात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. महायुतीकडून वरळीत मिलिंद देवरा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मिलिंद देवरा हे राज्यसभा सदस्य आहेत. ते तीन वेळा दक्षिण मुंबईचे खासदार राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान वरळी विधानसभा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीवेळी वरळी विधासनसभा मतदारसंघात ठाकरे गटाला फक्त ६५०० मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीत अतितटीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघात मिलिंद देवरा, आदित्य ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याद लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे तर मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात उतरणार आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रोड शो करत अर्ज दाखल केला. त्यांनी लोअर परळमध्ये एका मंदिरात पूजा केली. यावेळी किशोरी पेडणेकर, सचिन अहिर आणि पक्षाचे कार्यकर्ते होते.

अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील लोकांना कळलं की, भाजप खोटे आश्वासन देणारा पक्ष आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मतदान केलं. भाजपने महाराष्ट्राला लुटलं आहे'.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची २२ ऑक्टोबर रोजी प्रक्रिया सुरु होण्याआधी राज्यात १५३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंच्या नावावर रायगड जिल्ह्यात काही एकर जागा आहे. या जागेचं बाजार मूल्य १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. या दोन गाळ्याचं बाजार मूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे एक बीएमडब्लू कार आहे. तसेच त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत. बँक खात्यातही कोट्यवधींची रक्कम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT