Worli Hit And Run Case Saam Tv
मुंबई/पुणे

Mihir Shah: मिहीर शहानं अपघातानंतर केस-दाढी कारमध्येच कापली!, कोर्टात पोलिसांची माहिती, १६ जुलैपर्यंत कोठडी

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला अटकेनंतर आज शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने १६ जुलैपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

वरळी हिट अँड रन प्रकरणातील (Worli Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहीर शहाला (Mihir Sahh) १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर मिहीर शहाला आज शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीने ओळख लपवण्यासाठी अपघातानंतर आपले केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयात युक्तीवाद केला. मिहीर शहाला घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी विरारमधून अटक केली.

शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहाने ७ जुलै रोजी मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये कावेरी नाकवा (४५ वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला होता. तर या महिलेचा पती प्रदीप नाकवा जखमी झाले होते. अपघातावेळी मिहीर शहा दारूच्या नशेमध्ये कार चालवत होता. त्याने महिलेला काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या घटनेनंतर मिहीर फरार झाला होता. त्याला घटनेच्या तिसऱ्या दिवशी अटक करत आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

मिहीरच्या कोठडीची मागणी करत पोलिसांनी बुधवारी मुंबईतील शिवडी न्यायालयात सांगितले की, घटनेनंतर किती लोकांनी मिहीरला मदत केली होती आणि त्याला इतके दिवस लपवून ठेवण्यासाठी कोणी मदत केली याचा शोध घेत आहोत. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही आणि अपघातानंतर आरोपीने टाकून दिलेल्या कारच्या नंबर प्लेटचा शोध घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी कारमध्येच कापली असा युक्तीवाद पोलिसांनी न्यायालयात केला. पोलिसांनी मिहीरला ७ दिवसांची कोठडी सुनवण्यात यावी अशी मागणी केली होती.

आरोपी मिहीर शाहच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, ड्रायव्हर आणि मिहीरची एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याचा फोनही ताब्यात घेतला आहे. त्याला पोलिस कोठडीची गरज काय?, असा प्रश्न मिहीरच्या वकिलाने उपस्थित केला. मिहीरच्या वकिलाने असेही सांगितले की, मिहीरला मंगळवारी अपघातस्थळी नेण्यात आले होते. जिथे त्याने संपूर्ण घटना सांगितली. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ड्रायव्हर आणि मिहीरचे म्हणणे जुळले असून पोलिसांनी मिहीरला अटक करण्याचे कारण सांगितलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT