राजेंद्र शिंगणे Saam Tv
मुंबई/पुणे

अवैध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर महिला अधिकाऱ्यांची धडक कारवाई; मंत्री शिंगणेंकडून कौतुक

मध्य रात्री कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे मंत्री शिंगणे यांनी केले कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : अवैध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर महिला अधिकाऱ्यांनी रात्री धडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यात रात्री पावणे बारा वाजता पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहिती वरून सह आयुक्त कोकण, (अन्न) जिला ठाणे. यांनी उल्हासनगर येथील एका खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्याची तपासणी आदेश अन्न सुरक्षा अधिकारी अरुण वीरकायदे यांना दिले. सोमवार ता. 7 मार्च रोजी वीरकायदे या महिला अधिकाऱ्यांनी सदर क्रिष्णा ए -1 पाणीपुरी व भेलपुरी विक्री करणाऱ्या शॉप ची तपासणी केली असता, अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून अस्वछ अशा परिस्थितीत खाद्य पदार्थ विक्री करीत असल्याचे आढळले. शिवाय अन्न व सुरक्षा परवाना नसल्याचे आढळल्याने 7 मार्च रोजी तात्काळ खाद्य पदार्थ विक्री बंद कराण्याचे लेखी आदेश दिले.

मात्र सादर क्रिष्णा ए -1 पाणी पुरी वाल्याने बंदीचे आदेश जुगारून संध्याकाळी पुन्हा खाद्य पदार्थ विक्रीस सुरुवात केली. याबाबत सह आयुक्त कोकण सुरेश देशमुख (अन्न) यांना कळताच त्यांनी रात्री अन्न सुरक्षा अधिकारी अरुण वीरकायदे यांना याबाबत सूचना केली.

अस्वछ असलेल्या ठिकाणी अवैधपणे खाद्य विक्री होत असल्याने आणि जनतेचे आरोग्य धोक्यात असल्याचे पाहून महिला अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांनी तात्काळ रात्री 10.45 वाजता सदर खाद्य पदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. बंदी नोटीस देऊनही सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ विठ्ठल वाडी पोलीसांना पाचारण केले. आणि पंचनामा करून रात्री 11.45 मिनिटांनी सदर विक्रेत्या विरोधात FIR नोंद केली.

हे देखील पहा-

रात्री 10.45 वाजलेले असतांनाही सदर महिला अधिकाऱ्यांनी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य देते , आणि महिला म्हणून कुठेही वेळेचे भान न ठेवता जनतेच्या आरोग्यासाठी आणि अवैधपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर मध्य रात्री fir दाखल केला. अशी माहिती

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना कळली. मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ सदर महिला अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांना फोन करून त्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले. शिवाय महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. मंत्री शिंगणे यांनी दाखवली तत्परता आणि महिला अधिकाऱ्याचे केलेले कौतुक पाहता अन्न सुरक्षा विभागात आनंद व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT