Thane Police officials during a raid at a hotel in Bhiwandi where a sex racket was being operated Saam Tv
मुंबई/पुणे

असहाय्य महिलांना ती वेश्याव्यवसायात ढकलायची; टीप मिळाली, हॉटेलवर धाड टाकली; आतील दृश्य बघून सगळेच हादरले

Thane Police Expose Sex Racket: भिवंडीतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने उध्वस्त केला. महिला एजंटला अटक, दोन महिलांची सुटका करण्यात आली.

Omkar Sonawane

भिवंडीतील हॉटेलमध्ये सुरू असलेला सेक्स रॅकेट उघडकीस

ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाची मोठी कारवाई

महिला एजंट मुश्रत मिर्झा अटक, दोन महिलांची सुटका

रॅकेटमध्ये सहभागी इतर आरोपींचा शोध सुरू

कोंगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षानं (Anti-Human Trafficking Cell) कारवाई करत हॉटेलमध्ये सुरू असलेलं रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.

यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एजंट महिलेला अटक केली आहे.या कारवाईत महिलांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करून आर्थिक शोषण करणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुश्रत अन्सार मिर्झा (वय ४०) असून ती मुंबईच्या सांताक्रूझ (पूर्व) येथील रहिवासी आहे.

गुप्त माहितीच्या आधारे छापा

२० जानेवारी रोजी मानव तस्करीविरोधी कक्षाला भिवंडी तालुक्यातील गोवे नाका परिसरातील हॉटेल संदीप वेजेस येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला.

दोन महिलांची सुटका

छाप्यात मुश्रत मिर्झा हिला ताब्यात घेण्यात आले असून तिच्या तावडीतून ३६ आणि ३३ वर्षांच्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कोंगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४३(१), १४३(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) १९५६ मधील कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT