Bhyandar D-Mart Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Bhyandar D-Mart Fire: रजा नाकारल्याने तरुणीला राग अनावर; थेट डी-मार्टमध्येच लावली आग, खळबळजनक घटना!

या प्रकरणी २३ वर्षीय तरुणीवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Bhyandar News Today: बॉसने आपल्याला सुट्टी न दिल्याने संतप्त झालेल्या एका महिला कर्मचारीने संतापजनक कृत्य केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या संतप्त महिला कर्मचारीने भाईंदरच्या डी-मार्टमध्येच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणीवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ही तरुणी भाईंदर (Bhyandar) पश्चिमेच्या मुख्य डीपी रोडवरील डी मार्टमध्ये कामाला होती. तिला काही महत्वाच्या कामासाठी सुट्टी हवी होती मात्र व्यवस्थापनाकडून सुट्टी नाकारण्यात येत होती. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून नाराज होती.

गुरुवारी तिने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला. मात्र तिची सुट्टी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे या संतप्त तरुणीने रागाच्या भरात डीमार्ट मधीलपहिल्या मजल्यावरील कपडे आणि खेळणी ठेवलेल्या भागाला चक्क आग लावली. आग (Fire) लागल्याने डी मार्ट (D-Mart)मध्ये एकच घबराट पसरली. (Mumbai News)

यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत जवळपास २० हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्टोर व्यवस्थापक यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT