Nagpur Crime News: महिला डॉक्टर आंघोळ करायला गेली अन् ओरडतच बाहेर आली; नागपुरातील मेडिकल रुग्णालयात काय घडलं?

मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात एका महिला डॉक्टरचे दुसऱ्या निवासी डॉक्टरकडून आंघोळ करतानाचे व्हिडियो रेकॉर्डिंग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv
Published On

Nagpur Crime News Today: नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता नागपुरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात एका महिला डॉक्टरचे दुसऱ्या निवासी डॉक्टरकडून आंघोळ करतानाचे व्हिडियो रेकॉर्डिंग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Nagpur News
Junnar Fire : रात्रीत हाेत्याचं नव्हतं झालं... माजी सरपंचांसह पत्नीचा गुदमरुन मृत्यु; गावावर शाेककळा

संपूर्ण प्रकरण काय?

एका महिला डॉक्टरचे दुसऱ्या निवासी डॉक्टरकडून आंघोळ करतानाचे व्हिडियो रेकॉर्डिंग काढण्याचा प्रयत्न झाला. नागपूरच्या (Nagpur) मेडिकल या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच मेडिकल प्रशासनाने सहा सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली आहे. (Nagpur News)

Nagpur News
Sanjay Raut News: मुख्यमंत्रिपद अजितदादांकडे जाऊ नये यासाठी शिंदे गटाची माघार; संजय राऊत यांचा मोठा दावा

गुरुवारी रात्री द्वितीय वर्षाला असलेली महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली असताना एका निवासी डॉक्टरने मोबाईलमध्ये व्हीडीओ काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार महिला डॉक्टरच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. मेडीकल अधिष्ठाता कार्यालयात तक्रारीनंतर अधिष्ठात्यांनी तातडीने चौकशी समिती नेमली. संबंधित डॉक्टरच्या मोबाईलची झडती घेतली असता कोणतेही फोटो किंवा व्हीडीओ आढळले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com