badlapur car accident saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Accident VIDEO : बदलापूर अपघाताचा भयावह व्हिडिओ; भरधाव कारनं महिलेला उडवलं

Badlapur Car Accident: राज्यात मुंबई, पुण्यासह महानगरांत अपघाताच्या घटना वाढत आहेत. बदलापूर येथे आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

Saam Tv

मयुरेश कडव, साम प्रतिनिधी

बदलापूर : मुंबई आणि पुण्यातील हिट अँड रनच्या घटना ताज्या असतानाच, आता बदलापूरमध्येही भीषण आणि तितकाच भयावह अपघात झाला आहे. बदलापूर पूर्वेकडे आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास भरधाव कारनं एका पादचारी महिलेला उडवलं. यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

आधी पुणे नंतर मुंबई आता संपूर्ण राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यातच आता बदलापूर येथील खरवईमधील पनवेलकर भूमी कॉम्प्लेक्सजवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. बदलापूर येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला आणि या महिलेला जीव गमवावा लागला. मथुरा रामा इरले असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बदलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच आपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रहदारीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की वाहनचालक हा अत्यंत वेगात कार घेऊन जात होता. महिला ही पायी जात होती. तेवढ्यात एक भरधाव कार तिच्यामागून आली. तिला जोरदार धडक दिली. धडक बसताच महिला जोरात जमिनीवर आपटली. तसेच काही अंतरावर फरफटत गेली. हे दृश्य अत्यंत भयावह आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT