woman jumps in front of konkan railway along with 2 kids near goregaon in mangaon saam tv
मुंबई/पुणे

Raigad Shocking News : आईनं २ मुलींसह केली आत्महत्या; कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेत संपवलं जीवन

Raigad Latest News : कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली उडी मारून महिलेने दोन मुलींसह स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला आहे.

Siddharth Latkar

सचिन कदम, माणगाव | १ डिसेंबर २०२३

Raigad News :

कोकण रेल्वेच्या (kokan railway) कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली उडी मारून महिलेने दोन मुलींसह स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. अन्य मुलीचा शाेध सुरु असल्याचे पाेलीसांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलीसांन दिली. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे कोकण कन्या एक्स्प्रेस खाली उडी मारून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली.

संबंधित महिलेने दोन मुलींसह आत्महत्या करीत असल्याचा व्हॉईस मेसेज मैत्रिणीला पाठवला हाेता असेही पाेलीसांनी नमूद केले. दरम्यान महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. तिचा स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू असल्याचे पाेलीसांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीपातळी ९५.८९ टक्क्यांवर , सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT