Cyber Crime SaamTv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला २३ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

Crime News: या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Pune Crime: पुण्यात डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत एका ५० वर्षीय डॉक्टर (Doctor) महिलेने शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टर महिला शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहे. आरोपींनी डॉक्टर महिलेला समाजमाध्यमातून संदेश पाठविला होता.

समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनिचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून (लाइक्स) दिल्यास चांगला परतावा मिळेल,असे आमिष चोरट्यांनी संदेशाव्दारे दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले होते. (Pune News)

सुरुवातीला डॉक्टर महिलेला काही रक्कम भरण्यास सांगण्यात आले. सायबर चोरट्यांनी आणखी पैसे देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांना वेळोवेळी आमिष दाखवून त्यांच्याकडून २३ लाख ८३ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT