Nanded News: वर्ग मित्राची भेट ठरली अखेरची; पोहायला गेले अन्‌ दोन विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

वर्ग मित्राची भेट ठरली अखेरची; पोहायला गेले अन्‌ दोन विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडमध्ये आयटीआयचे शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना काळाने घात केला. गोदावरी नदीत (Godavari River) पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नांदेड (Nanded) तालुक्यातील राहटी शिवारात ही दुर्देवी घटना घडली. (Latest Marathi News)

Nanded News
Chandrashekhar Rao News: 'तेलंगणा मॉडेल सुरू करा; मी महाराष्ट्रात येणार नाही; चंद्रशेखर राव यांचे फडणवीसांना थेट आव्हान

नांदेड शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात बिलोली तालुक्यातील आटकळी येथील १९ वर्षीय शंकर धोंडिबा कदम आणि नांदेड तालुक्यातील पुयडवाडी येथील १९ वर्षीय शिवराज सुरेश कदम हे दोघे देखील शिक्षण घेत होते. सोमवारी दुपाऱी मयतासह इतर पाच जणांनी राहाटी येथे वर्ग मित्राच्या घरी जाण्याचा प्लॅन केला. सोमवारी दुपारी सातही मित्र राहाटी आपल्या मित्राच्या घरी गेले होते. मित्राची भेट झाल्यानंतर सातही जण पोहण्यासाठी गोदावरी नदी पात्रात गेले.

Nanded News
Gadchiroli News : हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त; वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

अन्‌ दोन्‍ही बुडाले

सर्वांनी गोदावरी नदीमध्ये उतरुन पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने शंकर कदम आणि शिवराज कदम हे दोघे नदीमध्ये बुडाले. दोघे जण पाण्यात बुडाल्याचे समजताच इतर मित्रांना धक्का बसला आणि त्यांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा शोध काही लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गोदावरी जिवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण केले. तीन तासाच्या अथक परिश्रमाने गोदावरी जिवरक्षक दलाच्या जवानांनी सायंकाळ पर्यंत शोध घेऊन दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या प्रकरणी लिंबगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com