Chandrashekhar Rao News: 'तेलंगणा मॉडेल सुरू करा; मी महाराष्ट्रात येणार नाही; चंद्रशेखर राव यांचे फडणवीसांना थेट आव्हान

'तेलंगणा मॉडेल सुरू करा. महाराष्ट्रात येणार नाही. मी मध्य प्रदेशात जाईन, असे आव्हान चंद्रशेखर राव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
Chandrashekhar Rao News
Chandrashekhar Rao NewsSaam tv
Published On

Chandrashekhar Rao On Devendra Fadnavis: भारतीय राष्ट्र समिती पक्षाने छत्रपती संभाजी नगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हजेरी लावली. या सभेत चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'तेलंगणा मॉडेल सुरू करा. महाराष्ट्रात येणार नाही. मी मध्य प्रदेशात जाईन, असे आव्हान चंद्रशेखर राव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. (Latest Marathi News)

भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, 'देशातील बुद्धिजीवी लोकांमध्ये आणि मला एक प्रश्न पडलाय की आपल्या महान देशाचे ध्येय काय आहे? आपला देश आपलं ध्येय विसरून गेला आहे असा प्रश्न मला पडला आहे'.

Chandrashekhar Rao News
APMC Market Election: महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरे गटाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली

'मी जे बोलणार आहे, ते इथेच विसरू नका, आपल्या गावात, भागातील लोकांमध्ये जाऊन बोला. जर आपला देश ध्येय हरवला आहे, तर मग कसं होईल? लोक सोन्याच्या विटा मागतायत का? चंद्र तारे मागता आहेत का, लोक पिण्याचं पाणी मागत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. मजूर काम नसल्याने रस्त्यावर येत आहेत', असे चंद्रशेखर राव म्हणाले.

'देशात लोक जाती धर्मावर विभागाले जात आहे. श्रीमंत श्रीमंत होत आहेत, गरीब गरीब होत आहेत. शेतकरी आत्महत्या करतायत आणि पंतप्रधानाला वेगळंच पडले आहे.जोपर्यंत आपण स्वतः होऊन वाघ होत नाही तोपर्यंत बदल होऊ शकणार आहे. भारताला बदलावं लागेल. भारतात परिवर्तन झाले पाहिजे, त्यासाठी ' बीआरएस' चा जन्म झाला आहे, संपूर्ण भारतीयांच्या हक्कांसाठी काम करणार आहे. घाबरून चालणार नाही. आपल्या लढाईत सत्य आहे',असा निर्धार चंद्रशेखर राव यांनी केला.

चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रमध्ये 'बीआरएस'चे सरकार आणा. प्रत्येक घरात पाच वर्षात पाणी देऊ, मग शहरात असो की ग्रामीण. शेतकऱ्यांना लागेल तेवढं पाणी देणार. शेतकऱ्यांना तेलंगणा सरकार जर मोफत वीज देत असेल तर महाराष्ट्र का देत नाही? तेलंगाना हे महाराष्ट्रापेक्षा कमजोर राज्य आहे. महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल का लागू होत नाही. तेलंगणामध्ये कोणतीही तलाठी व्यवस्था नाही'.

Chandrashekhar Rao News
Thackeray vs BJP: कोकणात नितेश राणेंची मोठी खेळी, ठाकरे गटाचे 3 नगरसेवक भाजपच्या गळाला

'तेलंगणामध्ये वीज मिळत नव्हती. पाणी मिळत नव्हते. शेतकरी आत्महत्या करत होते. ता संपूर्ण तेलंगणातील चित्र बदलले आहे. यासाठीच मी आवाज दिलेला आहे, आपकी बार किसान सरकार. आता मोठे मोठे नेते नको आहे. आपल्यातलाच कोणीतरी आमदार खासदार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

'जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करतोय. निवडणुकीत गुलाबी झेंडा फडकवा. तेलंगणा मॉडेल महाराष्ट्र सुरू करा, मी महाराष्ट्रात येणार नाही. मध्य प्रदेशात जाईन, असे आव्हान चंद्रशेखर राव यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com