पोटात ६५ कोकेनच्या कॅप्सुल ठेवणारी महिला डीआरआयच्या ताब्यात Saam Tv
मुंबई/पुणे

पोटात ६५ कोकेनच्या कॅप्सुल ठेवणारी महिला डीआरआयच्या ताब्यात

डीआरआयकडून महिलेला अटक

सूरज सावंत

मुंबई - मुंबईतील Mumbai छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर International Airport महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईमध्ये टान्झानियन  महिलेच्या अंतर्वस्त्रात कोकेनची cocaine capsule पुडी सापडली आहे. या महिलेच्या पोटातून तब्बल ६५ कोकेनच्या कॅप्सुल असा एकूण आठ कोटी रुपयाचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत डीआरआयकडून DRI महिलेला अटक करण्यात आली आहे.

किटवाना रामधानी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती अदिस अबाबा मार्गे टान्झानियाच्या दर-ए-सलाम येथून मुंबईमध्ये ५ ऑगस्टला आली होती. आरोपी महिला ही ड्रग्ससह मुंबईत आली असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.

हे देखील पहा -

त्यानंतर या महिलेला ताब्यात घेऊन तपासणी केली असता तिच्या अंतर्वस्त्रात लपवलेल्या पुडीमध्ये १६० ग्रॅम कोकेन सापडले. पण महिलेकडे आणखी ड्रग्स असल्याची खात्रीलायक माहिती असल्यामुळे डीआरआने महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने मागितली.

परवानगी मिळाल्यानंतर जे.जे. रुग्णालयात महिलेची तपासणी केली असता एक्सरेमध्ये महिलेच्या पोटात ड्रग्सच्या कॅप्सुल असल्याचे निष्पन्न झाले.भारतात ड्रग्सची तस्करी करण्यास तिला सांगण्यात आले होते. त्या बदल्यात या महिलेला साडेतीन लाख रुपये देण्याचे देखील कबुल केले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT