केडीएमसी क्षेत्रात सहा स्टेशनवर मिळणार रेल्वे पास...

महापालिका उभारणार हेल्पडेस्क
केडीएमसी क्षेत्रात सहा स्टेशनवर मिळणार रेल्वे पास...
केडीएमसी क्षेत्रात सहा स्टेशनवर मिळणार रेल्वे पास... प्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : १५ ऑगस्टपासून कोविड Covid लसीचे vaccines २ डोस घेवून, १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या railways तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे. हा पास देते, वेळेस होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी आणि रेल्वे पास वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटर शेजारी केडीएमसी KDMC तर्फे स्वतंत्र मदत कक्ष (हेल्प डेस्क) उभारले जाणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ या २ शिफ्टमध्ये महापालिका कर्मचारी या हेल्पडेस्कवर कार्यरत असणार आहेत.

हे देखील पहा-

महापालिका कार्य क्षेत्रातील डोंबिवली Dombivli, ठाकुर्ली, कल्याण, टिटवाळा, आंबिवली Ambivali आणि शहाड Shahad या ६ रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर लसीकरण Vaccination प्रमाणपत्राची आणि फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका Municipal Corporation कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. रेल्वे पाससाठी स्टेशनवर येणा-या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी, रेल्वेच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे तिकीट काऊंटरवर रेल्वे पोलिसांचे Police सहकार्य घेतले जाणार आहे.

"हे डॉक्युमेंट जवळ असणे आवश्यक..."

कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत आणि फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र, त्याची छायांकित प्रत असणाऱ्या, नागरिकांची सर्वप्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यानंतर या मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी (Verified) केल्याचा शिक्का मारुन, दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र आणि ओळखपत्र रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यावर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com