Bandra Worli Sea Link Saam TV
मुंबई/पुणे

Bandra Worli Sea Link: पंतप्रधान मोदींना बोलवा मगच...; वरळी सी लिंकवर महिलेची पोलिसांशी हुज्जत, नेमकं काय घडलं?

Viral Video: आपली चूक मान्य करण्याऐवजी या महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली.

Ruchika Jadhav

Woman Biker Threatens Police:

वांद्रे वरळी सी लिंकवर एका महिलेने राडा घतला आहे. सी लिंकवर ही महिला दुचाकी घेऊन आली होती. नियम मोडल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तिला अडवले. तसेच योग्य ती कारवाई, फाईन भरण्यास सांगितले. मात्र या महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. (Latest Marathi News)

वांद्रे वरळी सी लिंकवर ही महिला बुलेट घेऊन आली होती. महिला बाईक घेऊन पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिला अडवले. आपली चूक मान्य करण्याऐवजी या महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. इतकेच नाही तर पोलिसांना शिवीगाळ करत त्यांचे हात पाय तोडण्याचीही भाषा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मला फोन करतील तेव्हाच मी बाईकवरून उतरेन असंही ही महिला म्हणाली. अखेर पोलिसांनी या महिलेवर कारवाई करत बाईक जप्त केली आहे. या महिलेचे नाव नुपुर पटेल असून ती मध्य प्रदेशची राहणारीये. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

मी रोड टॅक्स भरते या रस्त्यावर चालण्याचा मला हक्क आहे, असं ही महिला म्हणते. तसेच नरेंद्र मोदींना मला फोन करायला सांगा मगच मी येथून जाणार अशी धमकी देखील महिलेने पोलिसांना दिली आहे. पोलिसांशी हुज्जत घालतानाचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर हस्यास्पद कमेंट केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT