Amravati Crime News: प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं, स्वत:लाही घेतलं पेटवून; अमरावतीमधील प्रेमाचा थरारक अंत

Crime News: धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
Amravati Crime News
Amravati Crime NewsSaam TV

Amravati News:

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आहे. त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या केलीये. या धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. (Latest Crime News)

Amravati Crime News
Mumbra Crime News : क्लिनिकपासून २ किमीवर आढळला डॉक्टरचा मृतदेह; मुंब्रातील हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. वाद वाढत गेला आणि प्रेमाचं नातं तुटलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. यामध्ये तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबत त्याचे भांडणही झाले.

याच भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने बदला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी घरी नसताना त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं. आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन या तरुणाने पुढे स्वत:लाही संपवून घेतलं.

वरुड तालुक्यातील वंडली येथे रविवारी रात्री १ च्या दरम्यान आई आणि मुलाची जाळून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने देखील स्वतः तेथेच जाळून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये मृतक लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्ष) अशी जाळून हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आरोपी आषिश ठाकरे (वय 25 वर्ष) असे स्वत: जाळून घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.

Amravati Crime News
Uttar Pradesh Crime: संतापजनक! मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर सामुहिक अत्याचार; घटनेनंतर पती- पत्नीने संपवलं आयुष्य

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com