Mantralay Glsses Broken Saam TV
मुंबई/पुणे

Mantralay Glsses Broken : मंत्रायलाच्या आणि परिसरातील गाड्यांच्या काचा अचानक फुटल्याने खळबळ, नेमकं काय घडलं?

Mumbai News : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचंही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News :

मंत्रालय आणि आजूबाजूच्या परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मंत्रालय आणि आजूबाजूच्या इमारतीच्या तसेच वाहनांच्या काचा अचानक फुटल्याची घटना समोर आली आहे.

मेट्रो कामाच्या ब्लास्टमुळे मंत्रालयाच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचंही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. (Mumbai News)

ब्लास्टनंतर मंत्रालयात पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. इतर काही कार्यालयांच्या काचांचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे. मंत्रालयाच्या जवळ मेट्रोच्या सबवेचं काम सुरु आहे. या सबवेच्या कामासाठी अंतर्गत ब्लास्ट सुरू होते, त्यावेळी घटना घडल्याचं समोर आलं आहे. (Latest News Update)

ब्लास्ट करताच अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने उडाल्याने मंत्रालयातील पार्किंगला असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच जवळ असलेल्या खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या पाहायला मिळत आहेत. सुदैवाने यात कुणीही जखमी नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला.

मुंबई मेट्रोचं स्पष्टीकरण

मंत्रालय ते विधानभवन भुयारी मार्गाच्या एन्ट्री आणि एक्झिटचं खोदकाम सुरू असून या कामादरम्यान कठीण खडक फोडण्यासाठी नियंत्रित ब्लास्टिंग केले जात आहे. काही दिवसांपासून ब्लास्टिंगचे काम कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. मात्र आज या कामादरम्यान मंत्रालयाच्या काही खिडक्यांचे नुकसान झाले.

मेट्रोच्या प्रवक्त्यांनी याबाबत म्हटलं की, आम्ही खात्री देतो की मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे. सध्या आम्ही मंत्रालयाजवळील भुयारी मार्गावर नियंत्रित ब्लास्टिंगचे काम थांबवत आहोत. या कामाचा आढावा घेतला जाईल. ब्लास्टिंगदरम्यान झालेल्या घटनेच्या कारणांचा अभ्यास करून सुधारणेनंतरच काम पुन्हा सुरू केले जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

SCROLL FOR NEXT