पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपी प्रवासी सेवेत तिकीट दरवाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. या दोन वर्षात प्रशासनाला ७०६ कोटीचा तोटा सहन करावा लागला. ही त्रूटी भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढ केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र निर्णयाच्या आधीच याला विरोध केला जातो.
पीएमपीएमएल बसमध्ये दररोज सुमारे १३ ते १४ लाख प्रवासी पीएमपी सेवेचा फायदा घेतात. शहरांतील विविध भागांमध्ये पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पीएमपीच्या बस धावत असतात. नागरिकांना सेवा देताना पीएमपीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे याचा भुर्दंड विनाकारण महापालिकेला सहन करावा लागतो. त्यामुळे हबा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी पीएमपीकडे करण्याची तयारी पुणे महापालिकेने सुरु केली आहे.
गेल्या काही दोन वर्षात आर्थिक तोटा तब्बल ७०६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या तोट्यातील ६०% रक्कम पुणे महापालिकेला ह्यावी लागते. त्यामुळे पालिकेवरील भारही वाढत आहे. त्यातच गेल्या ९ वर्षांपासून पीएमपीच्या तिकीट दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी महापालिकेकडून केली जाण्याती शक्यता आहे.
पीएमपीकडे सध्या सुमारे २०८० बस आहेत. त्यापैकी फक्त १६०० ते १७०० बस दररोज सेवेत असतात. उर्वरित बस बंद अथवा देखभाल दुरुस्तीसाठी डेपोतच असतात. पुणे व पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सुमारे ५० लाखांहून अधिक असताना दररोज ११ ते १२ लाखांहून अधिक प्रवासी दररोज पीएमपीने प्रवास करतात.
दरम्यान, पुणे एसटी विभागात आता नव्याने १३४ ई- बस दाखल होणार आहेत. एसटीच्या ताफ्यातून लालपरी गाड्यांची संख्या कमी करून नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून डिझेलच्या गाडीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवरील इलेक्ट्रिक बसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच १३४ इलेक्ट्रिक बस पुणे विभागात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ, आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास उपलब्ध होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.