
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधी सूर लावला आहे. महायुतीच्या विजयावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी वारंवार शंका उपस्थित केली आहे. यातच मारकडवाडीमध्ये काही जणांनी पुन्हा मतदान करण्याची घोषणा केली होती. यावरून मारकडवाडी देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे.
या गावातील नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर मॉक पोलिंग मतदान घेण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या ईव्हीएमविरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेत तुफान फटकेबाजी केली.
सर्व नव्या मंत्र्यांच अभिनंदन करतो. गोपिचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत हे विस्थापितांसाठी लढत आलोय. आम्ही अजून संघर्ष करु. जे विस्थापित आहेत, कष्टकरी लोकांचा वर्ग असतो. त्यांचा संघर्ष कधीच संपत नाही. त्यात आम्ही लहाणाचे मोठे झालो. पण देवाभाऊ सारखे नेत्रुत्व आहे याचा आम्हांला आनंद आहे. त्यांनी निर्णय घेतले. ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमची अपेक्षा होती. सत्तेत असूनही संघर्ष आमचा सावत्र भाऊ.
त्यामुळे त्याला आम्ही सोडू शकत नाही. आमचा संघर्ष दिर्घकालीन. आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. नक्कीच ज्या प्रश्नासाठी लढलो, रक्त सांडलं, ते कृषी खात मिळालं असतं तर आवडलं असत. शेतकऱ्यांसाठी चांगली धोरण आणता आली असती. पण संघर्ष आमच्या सोबत आहे. या अधिवेशनात कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकर्याला दिलासा मिळाला पाहिजे आणि सिंचन प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे. कर्जमाफी नक्की होईल असे सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.