राज्यात मासमुक्ती होणार? आरोग्यमंत्री म्हणाले... Saam TV
मुंबई/पुणे

राज्यात मास्कमुक्ती होणार? कोरोना निर्बंध पुर्णपणे हटणार? आरोग्यमंत्री म्हणाले...

राज्यात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तसेच यावेळी राज्यात मास्कमुक्ती होणार का राज्यातील निर्बंध हटणार का? या प्रश्नांवर राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे लसीकरणाविषयी माहिती देत म्हणाले, "कोविड नियतं सर्वांनी पाळले पाहिजेत. राज्य सरकार कोविड निर्बंध बऱ्याच अंशी संपुष्टात आणत आहे. जे काही काही प्रमाणात आहेत ते ठेवले आहेत जेणेकरून लसीकरणाचे प्रमाण वाढावे. लसीकरणचे प्रमाण ९२% पहिला डोस आहेत तर ७२% आहे. १२ ते १५ वयोगटातील मुलांचे २६% लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वयोगटामध्ये ६५% पहिला डोस तर ४०% दुसरा डोस लसीकरण झाले आहे. पण आम्हाला ही संख्या पूर्णत्वास न्यायची आहे. तरीही ढिलाई करू नये अशी विनंती मला करायची आहे".

राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटणार?

पुढे त्यांनी सांगितले, Disaster Management बद्दल जे निर्बंध लावण्यात येतात आणि निर्बंध शिथिल केले जातात जातात याबददलच्या मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून यासंदर्भात शिथिलीकरण करण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे कोणीही लसीकरण मध्ये दिरंगाई करू नये. निर्बंध अधिक शिथिल व्हावे यासाठी मुख्यमंत्री यांना सुचवलेलं आहे. बस, लोकल, मॉल अशा ठिकाणी अधिक निर्बंध शिथिल व्हावे असे सुचवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

सणासाठी मुभा;

टोपे म्हणाले,"येत्या २ तारखेला गुढी पाडवा, राम नवमी आहे, किंवा 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल यासाठी मुभा दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी यात शिस्तीने सहभाग विनंती घ्या", अशी विनंती राजेश टोपे यांनी यावेळी लोकांना केली.

मास्कमुक्ती होणार?

मास्कमुक्ती बद्दल राजेश टोपे यांनी सांगितले की, "काही देशात अजूनही कोरोना आहे. आपल्यामुळे कोरोना शकतो. त्यामुळे तूर्तास मास्क मुक्तीचा आपण विचार केलेला नाही. तरी जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील." त्यामुळे तूर्तास तरी राज्यात मास्कमुक्ती होणार नाही हे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT