Sambhaji Raje for the sixth seat of Rajya Sabha Will you join ShivSena?  Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार? राऊताचं सूचक ट्वीट

Sambhaji Raje for the sixth seat of Rajya Sabha Will you join ShivSena? संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत भाजपतून काढता पाय घेतला आणि राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रिंगणात उतरलेल्या संभाजीराजेंनी आपला विजय सुकर करण्यासाठी हाती शिवबंधन (Shivbandhan) बांधण्याची तयारी चालवल्याचं समजतंय. काही दिवसांपुर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्यसभेच्या (Rajyasabha Election) सहाव्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याची माहिती दिली होती. तसंच सर्वच राजकीय पक्षांनी मला या जागेसाठी पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी पत्राद्वारे केलंय. मात्र शिवसेनेनं (Shivsena) ही सहावी जागा लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने संभाजीराजेंचा (Sambhajiraje Bhosale) मार्ग खडतर झालाय. शिवाय संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतंय. (Sambhaji Raje for the sixth seat of Rajya Sabha Will you join Shiv Sena? Sanjay Raut's suggestive tweet)

हे देखील पाहा -

राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या सहा जागांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक तर भाजपकडे दोन जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस असून ही जागा आपण लढवणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर केलं होतं. अशाच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

लढणार आणि जिकंणार : राऊत

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे." असं ट्वीट करत राऊतांनी भाजपला आवाहान दिलंयं.

संभाजीराजेही सहाव्या जागेवर लढणार

संभाजीराजे भोसले यांच्या खासदारकीचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला. ते यापूर्वी भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपतून काढता पाय घेतला आणि राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर केलं. मात्र आता शिवसेनेनंही सहावी जागा लढवण्याच्या निर्णय घेतल्यानं संभाजीराजेंचा मार्ग खडतर झालाय. अशात संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ते राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकतात. त्यामुळे संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करु शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यसभेच्या जागांचं गणित

राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

सख्याबळ

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

संभाजीराजेंचं सर्व आमदारांना पत्र

संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे मदतीचे आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

संभाजीराजे यांचं पत्र!

आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे.

2007 पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली.

संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो."

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT