mla nawab malik Saam Tv
मुंबई/पुणे

ED arrests Nawab Malik: अनिल देशमुखांनंतर नवाब मलिकही राजीनामा देणार?

ईडीच्या कारवाईनंतर अनिल देखमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रकारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनाही आज ईडीने अटक केली आहे, त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटकाच आहे. काही महिन्यांत महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत पोहोचला आहे. याआधी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती. मंत्री अनिल देखमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रकारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनाही आज ईडीने अटक केली आहे, त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार का याकडे लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्या पक्षाचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेला निघणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान आज, दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आज सकाळीच ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. (ED Arrested Minister Nawab Malik After 8 hours of Inquiry).

गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांना स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहेत. मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल, असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय, मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हे देखील पहा-

तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यापूर्वी अनिल देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयाने 12 तास चौकशी केली होती. चौकशीदरम्यान माजी मंत्र्याकडून ईडीला समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाजे यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून मुंबईतील बार, पब, रेस्टॉरंट, हॉटेल्समधून १०० कोटी रुपये उकळण्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT