अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे : 'वाल्मीक कराड टोळी चालवत होता, त्याचे कोणाशी संबंध होते? त्यांचे व्यवहार काही असतील, काही मिळकत असेल तर धनंजय मुंडे यांना आरोपी करावेच लागेल, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमक्या कायद्याच्या बाबी काय आहेत? खरचं मुंडे यांना या प्रकरणी शिक्षा होऊ शकते का? याविषयी मिलिंद पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार म्हणाले, 'वाल्मीक कराड हा कटात निष्पन्न झाल्यावर त्याची टोळी समोर आली आहे. या प्रकरणी सर्व गुन्हे दाखल झाले आहेत. वाल्मीक कराड याच्या फोनवर गुन्ह्यातील अनेकांचे फोन आले. त्यानंतर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत. दोघांच्या नावावर काही एकत्र मिळकती असतील. दोघांचे फोन झाले असतील, तर त्यांना या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं. परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे तपास करताना पोलिसांना याप्रकरणी कसब लागणार आहे'.
'आरोपींनी संतोष देशमुख यांना मारल्यावर कुठे नेलं, कुणाला फोन केले हे सगळं तपासण महत्त्वाचे आहे. त्यांचा म्होरक्या हा वाल्मीक कराड आहे. त्याचे अनेक फोन हे धनंजय मुंडे यांना केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर काही बैठका झाल्या आहेत, अशी चर्चा आहे. आता हे शोधणं सगळं काम पोलिसांचे आहे. आता वाल्मीक कराड हा टोळी चालवत होता. त्याचे कोणाशी संबंध होते. त्यांचे व्यवहार काही असतील. काही मिळकती असतील तर धनंजय मुंडे यांना आरोपी करावेच लागेल, असे मिलिंद पवार म्हणाले.
'बीएनएस आणि आयपीसीमध्ये कलम नंबर वेगळे आहेत. प्रक्रिया आणि इतर सगळा तपास सगळा सारखाच आहे. १२० ब कटकारस्थान आहे. याप्रकरणी जर न्यायालयात सिद्ध झाले, तरच शिक्षा होऊ शकेल. या प्रकरणात मुख्य आरोपी आंधळे गायब आहे. संशय असा येतोय की, ही चेन कोणीतरी ब्रेक केली आहे. या प्रकरणात इतर आरोपीपैकी कोणी एक तर माफीचा साक्षीदार होऊ शकतो, असे ते पुढे म्हणाले.
'आंधळे याने फोन आणि व्हिडीओ केले, त्यानेच वाल्मीक कराडला फोन केले आहेत. त्याचे डिटेल्स गायब झाले मुख्य पुरावे जर गायब झाले, तर मोठा कसब आहे. जर असं झालं नाही, तर संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट नक्कीच आरोपींना मिळेल. एक आरोपी या प्रकरणात अजूनही फरार आहे. आंधळे सापडला तर पुरवणी दोषपत्र सादर होईल. हा थंड डोक्याने केलेला खून आहे. फाशीची शिक्षा द्यायची असेल, तर दुर्मिळ पैकी दुर्मिळ म्हणून हा खून खटला चालवायला लागेल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.