Baramati constituency political history 
मुंबई/पुणे

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

Baramati constituency political history : पोटनिवडणुकीत एकत्र आलेल्या पवार कुटुंबात पुन्हा मतभेद? 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण. बारामतीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता.

Bharat Mohalkar

2024 च्या लोकसभा आणि विधानसभेनंतर पवार कुटुंब पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष पेटण्याचे संकेत देण्यात आलेत.. मात्र यासंदर्भात कुणी वक्तव्य केलंय ? पवार कुटुंबातून कुणी नाराजी व्यक्त केलीय ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

अजित पवारांच्या मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अख्खं पवार कुटुंब मैदानात उतरलं... घरोघर जाऊन प्रचार केला... सुप्रिया सुळेंनी तर सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेत भाषणंही केलं... त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता 2029 मध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याचे संकेत रोहित पवारांनी दिलेत...

रोहित पवारांच्या वक्तव्याला कारण ठरलं ते जय पवारांनी 2029 ची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत केलेलं वक्तव्य.... 2029 ची निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं जय पवारांनी म्हटलंय..

दुसरीकडे पोटनिवडणूक सोडून 2029 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चेला तोंड फोडल्यानं युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी जय पवार आणि रोहित पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत..

खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी अपघाताबद्दल अनेक पुरावेच समोर आणले.. एवढंच नाही तर अजित पवारांना न्याय देण्यासाठी लढाई सुरु असल्याचं वारंवार सांगितलंय... याच काळात त्यांनी कर्जत जामखेडवरुनही लक्ष कमी केल्याची चर्चा आहे... त्यामुळे 2029 मध्ये दादांच्या राष्ट्रवादीनं जय पवारांना उमेदवारी दिल्यास बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार की जय पवार विरुद्ध रोहित पवार अशी लढत होणार हे बघणं औत्सुक्याचं असेल...

सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT