धक्कादायक! पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची व्हिडिओ करून आत्महत्त्या  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

धक्कादायक! पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची व्हिडिओ करून आत्महत्त्या

दोघीच्या त्रासाने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत गळफास लावून आत्महत्या

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून, तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड करून आत्महत्या केली आहे. या दोघीच्या त्रासाने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर या ठिकाणी घडला आहे. रोहित सुनील पवार (वय- 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी रेश्मा आणि तिच्या आईवर गुन्हा नोंद करण्यात आले आहे. रोहित आणि रेश्मा यांचा काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान, लग्नानंतर रेश्मा पती रोहितला आपण वेगळे राहू, असे म्हणत होती. पण, रोहित त्याला नकार देत होता. तर सासू आणि पत्नीने सतत त्रास देऊन त्याला शिवीगाळ देखील करत होते.

त्याला मानसिक त्रास दिला. या त्रासातून त्याने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले आहे. प्रथम त्याने मोबाईलमध्ये पत्नी आणि सासू याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

शाळेबाहेर 'स्टिंग' विकण्यास बंदी, अन्न-औषध प्रशासन मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Saturday Horoscope: सर्वांच्या साथीने रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT