सुशांत सावंत -
मुंबई : नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या हनुमान चालीसावर मातोश्रीचा आक्षेप का? शिवसेना आपल्या मातोश्रीसमोर आंदोलन करत आहेत. ही कुठली नवीन शिवसेना आहे असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'काल ईडीने पाच हजार पानांची चार्ज शीट दाखल केली आहे तरी नवाब मलिक (Navab Malik) यांचे मंत्रीपद का काढून घेतले जात नाही. न्यायालयाकडून दिलास दिला नाही अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. अटक झाल्यानंतरही मंत्रिमंडळात बिनखात्याचे मंत्री म्हणून नवाब मलिक आहेत. तुरूंगातून मंत्रीपद सांभाळत आहेत याची शाबासकी घेत आहेत.'
राज्याची अस्मिता दुखवणाऱ्या अनेक घटना मागील २ वर्षात घडत आहेत. पण त्याचे समर्थन मुख्यमंत्री करत आहेत. गुड गोईग असे सर्टिफिकेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत आहेत. सचिन वाझे हा काही लादेन नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते अशी आठवण करुन देत उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
हे देखील पाहा -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा सन्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. ज्या मुंबईत ब्लास्ट झाले त्याच दाऊदशी व्यवहार करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात मुख्यमंत्री बसले आहेत अशी टीकाही केशव उपाध्येंनी केली.
यावळी त्यांनी संजय राऊतांवरही टीका केली. अनेक बंटी बबली बाहेर येत आहेत. मातोश्रीला दोन कोटी देणारे बंटी बबली कोण आहेत. ठाण्यात फ्लॅट घेणारे किती बंटी बबली आहे. असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत हे स्वतः शरद पवार यांची टीम आहे अशी टीकाही त्यांनी राऊतांवर केली. तसंच नवनीत राणा मातोश्रीला हनुमान चालीसावर आक्षेप का? शिवसेना आपल्या मातोश्रीसमोर आंदोलन करत आहेत. ही कुठली नवीन शिवसेना आहे असंही ते म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.