Who Is Abhishek Ghosalkar Saam Tv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar : आधी शत्रू मग मित्र, गोड बोलून काटा काढला; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण आलं समोर

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.  फेसबुक लाईव्ह सुरु असतानात अभिषेक घोसाळकर यांना ५ गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणारा मॉरिस नोरोन्हा याने ही हत्या केली. घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिसने देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. (Latest Marathi News)

मात्र मॉरिसने एवढं टोकाचं पाऊल का उचललं. अभिषेक घोसाळकर यांची एवढी क्रूर हत्या मॉरिसने का केली असे प्रश्न यामुळे उपस्थित होतात. पोलीस तपासात काही गोष्टी हळूहळू उलगडत आहेत. आर्थिक वाद आणि राजकीय वैर यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मॉरिसने कट रचून ही हत्या केल्याचं समोर येत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं कारण?

मॉरिस नोरोन्हाविरोधात पोलीस ठाण्यात ३७६ (बलात्कार) आणि ५०९ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लिल शेरेबाजी करणे) असे दोन गुन्हे दाखल होते. बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक देखील झाली होती. काही महिने तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा होती. त्यातूनच त्यांच्यातील वैर वाढल्याचा पोलिसांना संशय आहे.

मात्र जेलमधून बाहेर येताच मॉरिसने दोघांमधील वाद मिटल्याचा बनाव केला आणि अभिषेक घोसाळकरांबरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अभिषेक यांच्या वाढदिवसाला मॉरिसने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्ताने त्याने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि ते संपत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

दोघांमध्ये राजकीय वैर देखील होतं अशी माहिती देखील समोर आली आहे. मॉरिस दहिसर वॉर्ड क्रमांक एकमधून मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छूक होता. मात्र अभिषेक यांचा यासाठी विरोध होता. घोसाळकर यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा दाखला देत नोरोन्हा याला प्रभागात निवडणूक लढवू नये असे वारंवार सांगितले.

दोघांमध्ये याबाबत बैठकही झाली होती. या बैठकांमध्ये अभिषेक यांनी मॉरिसला वॉर्ड क्रमांक ८ मधून निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. मात्र मॉरिसला ती मान्य नव्हती, अशी माहिती 'मिड डे'ने दिली आहे. याशिवाय दोघांमध्ये आर्थिक व्यवहारांवरुन देखील वाद होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT