मुंवई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर आज महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) आंदोलन करण्यात येत आहेत. अंडरवर्ल्डला फंडिंग केल्याचा तसेच तसेच दाऊदशी संबंधित संपत्ती विकत घेण्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र हे आरोप त्यांच्या मुलीने फेटाळले आहेत.
मलिकांच्या अटेनंतर त्यांची मुलगी निलोफर मलिक (Nilofar Malik) म्हणाल्या, 'आम्ही जमीन घेतली, मात्र जसं त्यांनी सांगितलं त्याप्रकारे नाही. नवाब मलिक (Nawab Malik) केंद्राच्या विरोधात लढत होते त्यामुळे त्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने नेण्यात आलं असल्याचंही त्या म्हणाल्या.
मी एक मुलगी म्हणून लढायला तयार आहे, सर्च वॉरंट घेऊन ईडीचे अधिकारी घेऊन आमच्या घरी आले ते त्यांची गाडी घेऊन गेले आणि ऑफिसला जाऊन त्यांना समोर सही करायला लावली असल्याचही त्या म्हणाल्या. दरम्यान, का असं असतं की प्रत्येक मुसलमानाला अंडरवर्ल्डशी जोडलं जातं? प्रत्येक मुसलमानाला स्वतंत्रपणे जगायचा हक्क नही आहे का? असा संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी विचारला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.